गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे बुजवा  

शहर शिवसेनेचे साताऱ्यात मुख्याधिकार्‍यांना निवेदन
Published:Aug 04, 2022 07:52 PM | Updated:Aug 04, 2022 07:55 PM
News By : Muktagiri Web Team
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे बुजवा  

सातारा : सातारा शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने भरण्यात यावेत अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सातारा पालिकेकडे केली आहे. हे मागण्यांचे निवेदन सातारा पालिकेच्या अतिरिक्त मुख्य अधिकारी पराग कोडगुले यांना सादर करण्यात आले.