लो. टिळकांच्या राजकीय, सामाजिक जीवनाला भगवद्गीतेतील कर्मयोगाचा आधार : कुलकर्णी

सातारा येथे टिळक भक्तांच्या मेळाव्यात हिंदुमहासभेची आदरांजली
Published:Aug 03, 2022 01:32 PM | Updated:Aug 03, 2022 01:35 PM
News By : Satara
लो. टिळकांच्या राजकीय, सामाजिक जीवनाला भगवद्गीतेतील कर्मयोगाचा आधार : कुलकर्णी

सातारा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना वयाच्या १६ व्या वर्षी भगवद् गीता हाती लागली होती. तेव्हापासून मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा भगवद् गीतेवरील टीका ग्रंथ लिहून होईपर्यंत लोकमान्यांनी गीतेचा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळेच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला भगवद् गीतेतील कर्मयोगाचा आधार असल्याचे जाणवते, असे प्रतिपादन अखिल भारत हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी(जयसिंगपूर) यांनी येथे बोलताना केले.