पीडितांसाठी खर्‍या अर्थाने विश्‍वासपात्र ‘भरोसा सेल’

Published:Feb 28, 2021 01:02 PM | Updated:Feb 28, 2021 01:02 PM
News By : Muktagiri Web Team
पीडितांसाठी खर्‍या अर्थाने विश्‍वासपात्र  ‘भरोसा सेल’

सातारा, दि. 27 ः प्रेम, विश्‍वास, आदर, काळजी, आपुलकीच्या आधारावर सुखी संसार सुरू असतानाच एखादे वादळ येऊन संसाराची गाडी भरकटते. इगो, संशय, मत्सर, अविश्‍वास अशा अनेक कारणांनी संसारामध्ये भांडणे लागतात. ही भांडणे चार भिंतीत न राहता अनेकदा संसार मोडण्याची वेळ येते. अशावेळी दोन्ही बाजू समजून घेऊन समझोता करणार्‍या हक्काच्या आणि विश्‍वासू संस्थेची गरज असते. पोलीस दलाच्या ‘भरोसा सेल’ने आपले नाव सार्थ करून दाखवत गेल्या वर्षभरात 46 व यावर्षीच्या 9 अशा 55 जणांचा संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे.