महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीराम उद्योग महाविद्यालय, पाणीव (ता. माळशिरस) यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे कृषिकन्या प्रणिता कृष्णा जाधव हिने शेतकर्यांच्या जनावरांसाठी मोफत लसीकरण व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
बिजवडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीराम उद्योग महाविद्यालय, पाणीव (ता. माळशिरस) यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे कृषिकन्या प्रणिता कृष्णा जाधव हिने शेतकर्यांच्या जनावरांसाठी मोफत लसीकरण व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
यावेळी डॉ. संदीप नाळे यांनी वातावरणात होणार्या सततच्या बदलामुळे जनावरांना कोणते आजार होऊ शकतात. त्यावर काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. कोणती खबरदारी घ्यावी आदीबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले.
कृषिकन्या प्रणिता जाधव हिने पावसाळी वातावरणात जनावरांमध्ये पसरणारे रोग नियंत्रणासाठी जनावरांच्या गोठ्यात जाऊन लसीकरण मोहीम राबवली.
या उपक्रमासाठी प्रणिता जाधव हिला श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य पी. टी. कोलेकर, प्रा. विश्वास केकान, प्रा. एस. एन. कोळेकर, प्रा. तुकाराम बोडके, प्रा. ए. एस. फुटाणे, प्रा. महेश चव्हाण, प्रा. दत्तात्रय राऊत, प्रा. संदेश घोरपडे, प्रा. डी. ए. ढेरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.