कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व
भुईंज : कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आशाताईंना गुडुची टॅबलेट, सॅनिटायझर व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे नियोजित सातारा दौर्यावर आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात सुवर्णा दगडे, वैशाली भोसले, अर्चना झोरे, रजनी ओतारी व अनिता एरंडे या आशाताईंना किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, संचालक मधुकर शिंदे, ‘भाजपा’चे जिल्हा उपाध्यक्ष सतीश भोसले, सरचिटणीस सचिन घाटगे, वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, वाई शहराध्यक्ष राकेश फुले, भुईंजच्या सरपंच पुष्पा भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, यश भोसले, इशान भोसले, शेखर भोसले-पाटील, उद्योजक रणजित सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गुडुची टॅबलेटचे औषधी गुणधर्म
गुडुची टॅबलेटमध्ये जीवनावश्यक पोषक तत्त्व वाढण्यास मदत होते. ही टॅबलेट विषाणू अथवा जीवाणूजन्य ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, वास किंवा चव जाणे व विकृत कप आदी लक्षणांवर प्रभावी काम करते. गुडुची टॅबलेटच्या सेवानाने पचन संस्था बळकट होऊन यकृताची कार्यक्षमता वाढते. तसेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.