पाचगणीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी

‘टेबललँड व्यापारी असोसिएशन’ची मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी
Published:Sep 19, 2020 02:50 PM | Updated:Sep 19, 2020 02:50 PM
News By : Muktagiri Web Team
पाचगणीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी

कोरोनाचे संकट कोसळल्याने शासनाने 20 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली. गेली सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाचगणी शहरातील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असल्याने पॉइंटवरील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी टेबललँड व्यापारी असोसिएशनच्यावतीने पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.