‘कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणे आवश्यक आहे. गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलमध्ये केल्यास रुग्ण संख्या कमी करता येऊ शकते,’ असे मत परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी व्यक्त केले.
निढळ : ‘कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणे आवश्यक आहे. गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलमध्ये केल्यास रुग्ण संख्या कमी करता येऊ शकते,’ असे मत परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी व्यक्त केले.
कोरोनाची दुसरी लाट खूप मोठ्या प्रमाणात समाजात पसरत असून, खटाव तालुक्यातील बुध येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ग्रामदक्षता कमिटीने बुध बंदचा निर्णय घेतला होता. याबाबत परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी बुध गावाला भेट देवून संपूर्ण भागाची पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, पत्रकार प्रकाश राजेघाटगे, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे, सर्कल अमृत नाळे, तलाठी किशोर घनवट, बीट अंमलदार सचिन माने, कुदळे व ग्रामदक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
तसेच बुध आरोग्य उपकेंद्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला त्यांनी भेट दिली. तेथे काही अडचणी आल्यास तत्काळ अडचणी सोडविल्या जातील. लसीकरण मोहीम 100 झाली पाहिजे. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होईल. यासर्व काळात प्रशासन व ग्रामसुरक्षा कमिटीने हातात हात घालून काम केल्यास कोरोनाच्या संकटावर मात करू शकतो. गावातील सर्व दुकानदारांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, बंदच्या काळात दुकाने चोरून दुकाने उघडली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.
ग्रामसुरक्षा कमिटीला शासनाने भरपूर अधिकार दिले असून त्या अधिकाराचा वापर कमिटीने करावा, काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, बुध येथील जिल्हा परिषद शाळा, नागनाथ विधा मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली व या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, असे ग्रामसुरक्षा कमिटीच्या सदस्यांना सांगितले.