पाचगणी डॉन अॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
पाचगणी : पाचगणी डॉन अॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
रविवारी (दि. 25) आ. मकरंद पाटील यांनी कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेतली. काही रुरग्ण हे बेल एअर रुग्णालयात दाखल करण्यात आहेत. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. तर काही रुग्ण हे डॉन अॅकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधला. त्यांना धीर देत आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेवण, नाश्ता वेळेवर मिळत आहे की, नाही याची विचारणा केली. त्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. याशिवाय प्रशासनाच्या ही त्यांनी अडचणी समजून घेतल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम, पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, महाबळेश्वर पालिका मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणीचे सपोनि सतीश पवार, नगरसेवक नारायण बिरामणे, फादर टॉमी, संदीप बाबर, जतीन जोश, प्रकाश गोळे, सुनील सनबे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाशी सामना करण्याकरिता डॉन येथील शासनाच्या कोविड सेंटरमध्ये पाचगणी नगरपरिषदेच्या वतीने अद्ययावत असे पन्नास बेड बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे पन्नास बेड ऑक्सिजनयुक्त व पन्नास साधे बेड उपलब्ध होणार आहेत. यामुळे बेल एअर हॉस्पिटलवरील रुग्णांचा वाढता भार कमी होण्यास मदत होणार असून, रुग्णांची हेळसांड त्यामुळे थांबणार आहे.
पाचगणी-महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी बाहेरील गाड्या येऊच नयेत तसेच पाचगणीलगतच्या कोविडग्रस्त गावातील व्यक्ती गाव सोडून पाचगणीत येऊ न देता त्यांना तेथेच अटकाव करावा म्हणजे कोरोना स्प्रेडर फिरणार नाहीत. त्याचा फायदा संसर्ग रोखण्यास होईल. याकरिता पोलीस प्रशासने दक्षता घेत बंदोबस्त वाढवावा, अशी सूचना आ. मकरंद पाटील यांनी पोलीस प्रशासनास केली.
बेल एअर हॉस्पिटल या ठिकाणी सर्व अधिकार्यांना मार्गदर्शक सूचना देताना कोविड संकटाचा सामना अधिक धैर्याने करीत लवकरच आपल्या सर्वांच्या साथीने कोविड मुक्त तालुका करावयाचा आहे. त्याकरिता आपले योगदान अनमोल आहे.
- आ. मकरंद पाटील, वाई-महाबळेश्वर-खंडाळा.