वाई येथे दारु विक्री करणार्‍या युवकास अटक

1.12 लाखाचा मुद्देमाल जप्त 
Published:May 03, 2021 07:36 PM | Updated:May 03, 2021 07:36 PM
News By : Muktagiri Web Team
वाई येथे दारु विक्री करणार्‍या युवकास अटक

लाखानगर वाई येथे दारु विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी छापा टाकून युवकास ताब्यात घेतले. त्या युवकाकडून सुमारे इंडिका कारसह एक लाख बारा हजार 840 रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून त्या युवकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.