पाचगणीत ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

Published:Aug 27, 2020 02:38 PM | Updated:Aug 27, 2020 02:38 PM
News By : Muktagiri Web Team
पाचगणीत ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

पाचगणी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने स्वतःची अनोखी अशी यंत्रणा आज राबवल्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत पाचगणीसह ग्रामीण भागात कसल्याही वाद्यांचा निनाद न करता शांततेने आणि उत्साहात घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.