‘राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख अशा अनेक नवरत्नांमुळे ही माती पवित्र झाली. या पवित्र मातृभूमीत जन्म घेतला त्याचा आज आपल्या प्रत्येक महिलांनी त्यांचे विचार आचाराप्रमाणे वागणे गरजेचे आहे. कोणताही अत्याचार सहन करून नका, त्याचा विरोध करा. महिला ही माया, ममता, प्रेम याचा सागर आहे, पण वेळ पडल्यास दुर्गा व महाकाली अवतार घेऊन राक्षसी प्रवृत्ती असणार्या नराधमांचा वध कराय मागे पुढे पाहत,’ असे प्रतिपादन म्हसवड पालिकेच्या माजी उपन
म्हसवड : ‘राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख अशा अनेक नवरत्नांमुळे ही माती पवित्र झाली. या पवित्र मातृभूमीत जन्म घेतला त्याचा आज आपल्या प्रत्येक महिलांनी त्यांचे विचार आचाराप्रमाणे वागणे गरजेचे आहे. कोणताही अत्याचार सहन करून नका, त्याचा विरोध करा. महिला ही माया, ममता, प्रेम याचा सागर आहे, पण वेळ पडल्यास दुर्गा व महाकाली अवतार घेऊन राक्षसी प्रवृत्ती असणार्या नराधमांचा वध कराय मागे पुढे पाहत,’ असे प्रतिपादन म्हसवड पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांनी केले.
म्हसवड येथे सूर्यवंशी परिवारातर्फे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सूर्यवंशी पुढे म्हणाल्या, ‘स्वातंत्र्योनंतर काळामध्ये महिलेचे चूल आणि मूल इथपर्यंत अस्तित्व होते. मात्र, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने महिला घरा बाहेर पडली. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन सर्व क्षेत्रांत पुरुषाप्रमाणे काम करून चूल आणि मूल ही परंपरा मोडीत काढून आज राजकारणापासून अंतराळापर्यंत यशस्वी झेप घेणारी आधुनिक महिला बनली आहे. महिला संघटित होऊन एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायात स्वत:च्या पायावर उभी राहत आहेत, हे खरंच कौतुकास्पद आहे.’
महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहत असताना आपल्या घराकडे दुर्लक्ष करता कामा नये, त्याचबरोबर मुली-मुलांच्या शिक्षणाला पहिले प्राधान्य द्या, सध्याच्या जगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे सर्व करत असताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे ही दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचे आवाहन स्नेहल सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी अनुराधा देशमुख, मंजूषा सूर्यवंशी, नगरसेविका हिंदमालादेवी राजेमाने, सविता सूर्यवंशी, चंदा माने, बंटी राजेमाने, जयमाला सूर्यवंशी, लता शिंदे, पल्लवी देशमुख, रंजना रसाळ, कल्याणी कुंभार, सुनीता सरतापे, कल्याणी तावरे, योगिता गांधी, डॉ. रेश्मा काटकर, प्रतिभा शहा, छाया सरतापे, मनीषा पोळ आदी शिक्षक कॉलनी, महादेव मळा, चोपडे वस्ती, लिंगे मळा, भगवान गल्ली, कुंभार टेक, वैभव नगर, आंबेडकर नगर, महात्मा फुलेनगर, क्रांतिसूर्य नगर, आदी ठिकाणच्या महिला उपस्थित होत्या.