कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली असून, आज पाचगणी पोलिसांनी मास्क न घालता फिरणार्या नागरिक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
पाचगणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली असून, आज पाचगणी पोलिसांनी मास्क न घालता फिरणार्या नागरिक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारनेही अनलॉक केले असून, हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन नगरी पाचगणीत नागरिकांची वर्दळ वाढली आहे. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, फिरताना आपल्या तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ आरविंद माने, एस. जी. नेवशे, एम. सी. जायगुडे, एन. सी. कदम, नीलिमा झोरे, जीवन मोहिते, तुषार जगताप, अमोल कदम, गणेश धनावडे यांनी आज दिवसभरात मास्क न वापरणे, सोबत कागदपत्रे न बाळगणे, ट्रिपल सीट त्याचबरोबर नो-पार्किंग अशा 75 जणांवर कारवाई करत 22 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.