ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

तयारी अंतिम टप्प्यात; डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली पाहणी
Published:1 y 8 m 1 d 7 hrs 36 min 44 sec ago | Updated:1 y 8 m 1 d 7 hrs 36 min 44 sec ago
News By : कराड | संदीप चेणगे
ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

शिवराज्याभिषेक संकल्पनेवर आधारित प्रवेशद्वाराची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष सर्वत्र साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे प्रवेशद्वार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर उभारण्यात येत आहे. त्याचसोबत अयोध्या येथे प्रभू श्री रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्री रामाची प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभारली जाणार असून, हे या महोत्सवाचे आगळे-वेगळे आकर्षण ठरणार आहे.