तब्बल चार टन म्हैस वर्गीय जनावराच्या मांसाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
कराडः तासवडेनजीक पोलिसांची कारवाई
Published:Nov 22, 2023 04:38 PM | Updated:Nov 22, 2023 04:38 PM
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : म्हैस वर्गीय जनावराच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो पोलिसांनी पकडला असून कराडण्याची तळबीड येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे या टेम्पोतून सुमारे चार टणाहून अधिक म्हैस वर्गीय जनावराचे मांस जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१.११.२०२३ रोजी मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी व त्यांचे विश्वासू सहकारी नितीन पायगुडे, कृष्ण सातपुते यांनी कराड जवळ तळबीड पोलीस स्टेशन च्या हद्दीत एका पिकअप टेम्पोत बीफ घेऊन जात असल्याचा संशय आल्याने सदर टेम्पो तासवडे टोलनाका येथे तळबीड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतला. पोलिसांनी टेम्पो चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता चालकाने त्याचे नाव प्रशांत दुधाळे असे सांगितले. सदर जनावरांच्या मास बाबत विचारणा केली असता त्याने म्हशीचे मास असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी मास वाहतुकीचा परवाना व पशुसंवर्धन विभागाचा जनावरे कापण्याचा परवाना तसेच पशुवैद्यकीय दाखला आहे का ? याबाबत विचारणा केली असता त्यांनी माझ्याकडे तसे कोणतेही परवाने नसल्याचे सांगितले. तसेच सदरचे मास हे कराड मधील मुजावर कॉलनीत एका बेकायदेशीर कत्तलखान्यात म्हैस वर्गीय जनावरे कापून त्याचे मांस टेम्पो मध्ये भरून ते मी मुंबई येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.