जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन : प्रतापगडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त
Published:Dec 21, 2020 03:36 PM | Updated:Dec 21, 2020 03:36 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने तसेच ग्रामपंचायतींच्या  निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.