वाठार : - मालखेड ता.कराड येथे अधिक मासानिमित्त श्री.अधिक मास महात्म पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री.विष्णू लक्ष्मी मंदिर येथे दि.९पासून पारायण सोहळा सुरु होणार असून पारायणाची सांगता दि.१३ रोजी होणार आहे. पारायण सोहळा पुजन प्रदिप तांबवेकर व योगी तपस्वी दादा महाराज १०८ शिवमंदीर शिरगांव भाळवणी फाटा यांच्या हस्ते होणार आहे. पारायण सोहळ्यात पहाटे ५ ते ६.३०काकड आरती, सकाळी ८ ते१२ अधिक मास महात्म्य ग्रंथ वाचन, दुपारी २ ते ४ मालखेड भजनी मंडळ यांचे रोज भजन, संध्याकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ रात्री ९ ते११ किर्तन होणार आहे. बुधवार दि.९ रोजी ह.भ.प.राजेंद्र माने पांचुब्री, दि.१०रोजी ह.भ.प.भागवताचार्य विष्णू महाराज आंबेजोगाई, शुक्रवार, दि.११रोजी ह.भ.प.हणमंत घार्गे, शनिवार, दि. १२रोजी ह.भ.प. बळीराम यादव यांची सुश्राव्य किर्तने होणार आहेत. रविवार दि.१३रोजी सकाळी ८.३० ते९.३०सांगता ग्रंथपूजन प्रदिप तांबवेकर यांच्या हस्ते, ९.३०ते११.०० काल्याचे किर्तन ह.भ.प. रामायणाचार्य हेंमंतजी महाराज मराठे, तसेच महाप्रसाद होणार आहे. पारायण सोहळा व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.नंदू महाराज तडसर हे असतील. पारायण सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.