‘म्हसवडसाठी कदम व जगताप कुटुंबीयांचे खास नातं आहे. डॉ. पतंगराव कदम यांचे म्हसवड शहर व येथील जनतेवर खूपच प्रेम होते. डॉ. विश्वजित कदम यांनी कदम यांचा वारसा कायम पुढे चालू ठेवलेला आहे व तो कायम राहणार आहे. गरीब सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आमचे ट्रस्ट कार्यरत आहे. कोरोना महामारीच्या संकटात अडकलेल्या जनतेला मदतीचा हात देणे, हे आमचे कर्तव्य आहे. आरोग्यविषयक साहित्य हे सामान्य रुग्णांसाठी उपयोगी पडेल याची खात्री आहे. गरज पडल्यास अजूनही मदत करू,’ अशी ग्वाही भारती हॉस्पिटलचा कार्यकारी संचालक डॉ. अ
दहिवडी : ‘म्हसवडसाठी कदम व जगताप कुटुंबीयांचे खास नातं आहे. डॉ. पतंगराव कदम यांचे म्हसवड शहर व येथील जनतेवर खूपच प्रेम होते. डॉ. विश्वजित कदम यांनी कदम यांचा वारसा कायम पुढे चालू ठेवलेला आहे व तो कायम राहणार आहे. गरीब सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आमचे ट्रस्ट कार्यरत आहे. कोरोना महामारीच्या संकटात अडकलेल्या जनतेला मदतीचा हात देणे, हे आमचे कर्तव्य आहे. आरोग्यविषयक साहित्य हे सामान्य रुग्णांसाठी उपयोगी पडेल याची खात्री आहे. गरज पडल्यास अजूनही मदत करू,’ अशी ग्वाही भारती हॉस्पिटलचा कार्यकारी संचालक डॉ. अस्मिताताई जगताप यांनी दिली.
भारती विद्यापीठ पुणेच्या डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण ट्रस्टमधून म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोरोना निवारणासाठी मदत म्हणून साडेसहा लाख रूपयांचे साहित्य नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिताताई जगताप यांच्या हस्ते सहा लाख सहासष्ठ हजारांचे कोरोना उपचारासाठी वैद्यकीय उपचारांचे साहित्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्ष एम. के. भोसले, नगराध्यक्ष तुषार वीरकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर, नगरसेवक अकील काझी, विकास गोंजारी, युवराज सूर्यवंशी, विजय धट, अनिल लोखंडे, डॉ. वसंत मासाळ, कैलास भोरे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने कुलदैवत असणार्या म्हसवडवासीयांकरिता सदर वैद्यकीय उपचारांचे साहित्य म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. दुष्काळी भागावर कदम कुटुंबीयांचे विशेष लक्ष असून डॉ. विश्वजित कदम तो वारसा पुढेही जपत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. भोसले, नगराध्यक्ष तुषार वीरकर, नगरसेवक युवराज सूर्यवंशी, अकील काझी यांनी मनोगत व्यक्त केले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी कोरोना सद्य:स्थितीबाबत माहिती दिली.
कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह डॉ. रोहन मोडासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत काकडे, डॉ. शेळके व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य कर्मचार्यांच्या कार्याची डॉ. अस्मिता जगताप यांनी विशेष दखल घेतली व त्यांच्या कामास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रा. विश्वंभर बाबर यांनी सूत्रसंचालन केले. विजय भट यांनी आभार मानले.