‘स्पर्धेच्या युगात युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत आपले करिअर घडवावे,’ असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.
बिजवडी : ‘स्पर्धेच्या युगात युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत आपले करिअर घडवावे,’ असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.
वावरहिरे (ता. माण) येथील घोडेमाळावर जीसी बॉईज क्रिकेट क्लब, वावरहिरे यांच्या वतीने भव्य हापपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे नेते डॉ. संदीप पोळ यांनी अंजनी महिला पतसंस्थेचे हेमाकांत बुट्टे यांच्या गोलदांजीवर जोरदार फटकेबाजी करत स्पर्धेला शानदार सुरुवात केली.
यावेळी सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक व माण उत्तरचे चंद्रकांत जगदाळे, वावरहिरेचे उपसरपंच सुरेशराव काळे, दानवलेवाडीचे सरपंच देवराज तरटे, माजी सरपंच नुरमुहमंद मोदी, अजित मोदी, समीर ओबांसे, विजय कुदळे, वसंत भोसले, तुलशीराम यादव, लखन खुस्पे, जितेंद्र यादव, प्रतीक कुदळे, ॠषीकेश हजारे आदी मान्यवर, क्रिकेटप्रेमी खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत जगदाळे यांच्या वतीने अकरा हजार एक रुपये, उपविजेता संघाला माजी पंचायत समिती सदस्य रमेश कदम व संदीप चव्हाण यांच्या वतीने सात हजार एक रुपये, तृतीय क्रमांकास हणमंत वाघ यांच्या वतीने पाच हजार एक रुपये तर चतुर्थ क्रमांकास मधुकर अवघडे यांच्या वतीने तीन हजार एक रुपये अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकास विजेता संघाला गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रतीक विजय कुदळे यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलदांज, सलग तीन षटकार, हॅट्ट्रिक अशी वैयक्तिक अनेक बक्षिसेही लावण्यात आली आहेत.
तरी या स्पर्धेचा लाभ वावरहिरे व परिसरातील सर्व खेळाडू व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन जीसी बॉईज क्रिकेट क्लब वावरहिरे यांच्या मार्फत करण्यात आले.