‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत करण्यासाठी वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने 100 बेड कोरोना केअर सेंटरकरिता वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत,’ अशी माहिती दि वाई अर्बन को. आँप. बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली.
वाई : ‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत करण्यासाठी वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने 100 बेड कोरोना केअर सेंटरकरिता वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत,’ अशी माहिती दि वाई अर्बन को. आँप. बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली.
सीए. चंद्रकांत काळे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात व संपूर्ण देशात थैमान घालत असलेल्या कोरोना रोगाचा मुकाबला करणे, ही सर्वांचीच जबाबदारी बनली आहे. अशा अडचणीच्या काळात वाई अर्बन बँक परिवाराने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाई परिसरात 100 बेड कोरोना केअर सेंटरसाठी मदत देण्यात आली आहे. यापुढील काळातही कोरोना रोगाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी तसेच कोविड सेंटरसाठी आवश्यक असेल ती मदत शासनास, देण्याचे सीए. चंद्रकांत काळे यांनी वाई अर्बन परिवाराच्या वतीने सांगितले. वाई परिसरात अनेक रुग्णांचे बेड मिळत नसल्याने हाल होत आहेत.
गेल्या 7-8 दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने त्वरित निर्णय घेऊन शासनाकडे 100 बेड तातडीने कोविड केअर सेंटरला मदत म्हणून दिले आहेत.
यापूर्वी मागील वर्षात कोरोना निर्मूलनासाठी बँकेच्या वतीने 25 ऑक्सिजन सिलिंडर कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले होते. त्याचप्रमाणे महसूल, पोलीस व वैद्यकीय क्षेत्रांत काम कर्मचार्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले होते. सर्व नागरिकांनी शासनाने घालून दिलेले कोरोना उपाययोजना, सोशल डिस्टन्िंसग, मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करून लवकरच सर्वजण कोविडच्या संकटातून यशस्वीपणे बाहेर पडू या, असा विश्वासही सीए. चंद्रकांत काळे यांनी व्यक्त केला.
कोविड केअर सेंटरला 100 बेड देतेप्रसंगी वाई नगरीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत, बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक डॉ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, अॅड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, अॅड. सीए. राजगोपाल द्रविड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, अंजली शिवदे, गीता कोठावळे, सीए. किशोरकुमार मांढरे, अनिल देव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, काशीनाथ शेलार, अरुण पवार, प्रशांत नागपूरकर, युनूस पिंजारी, दिशा अॅकॅडमीचे संचालक डॉ. नितीन कदम, पृथ्वीराज पिसाळ-देशमुख, चंद्रकांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.