छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आणि टोपलीभर ताज्या रसरशीत भाज्या, फळझाडांचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत, वयाच्या 82व्या वर्षी देखील ताठ कण्याने दररोज रानात मजुरीने राबणार्या झिंगराअक्का कुंभार या कष्टकरी वृद्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर मानाचं स्थान आणि साडीचोळी देऊन सन्मान, अशा अनोख्या आणि शेतकरी, कष्टकर्यांच्या शेतमालाचा, श्रमाचा गौरव करणार्या कृतीने भुईंज येथील साक्षी इरिगेटर्सचे नव्या वास्तूत दिमाखात स्थलांतर झाले.
भुईंज : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आणि टोपलीभर ताज्या रसरशीत भाज्या, फळझाडांचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत, वयाच्या 82व्या वर्षी देखील ताठ कण्याने दररोज रानात मजुरीने राबणार्या झिंगराअक्का कुंभार या कष्टकरी वृद्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर मानाचं स्थान आणि साडीचोळी देऊन सन्मान, अशा अनोख्या आणि शेतकरी, कष्टकर्यांच्या शेतमालाचा, श्रमाचा गौरव करणार्या कृतीने भुईंज येथील साक्षी इरिगेटर्सचे नव्या वास्तूत दिमाखात स्थलांतर झाले.
भुईंज येथील दिलीप भोसले हे साक्षी इरिगेटर्सच्या माध्यमातून ठिबक सिंचन तसेच शेती निगडीत साहित्याचा व्यवसाय करत आहेत. प्रामाणिक, दर्जेदार आणि प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन सर्वप्रकारचे मार्गदर्शन, मदत यामुळे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार जिल्ह्याच्या विविध भागात विस्तारला आहे. त्यामुळेच पहिली जागा अपुरी पडू लागल्याने त्यांनी हायवेलगत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय रोडवर ‘साक्षी इरिगेटर्स’चे भव्य दालन सुरू केले. छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या नव्या ठिकाणी स्थलांतर सोहळा पार पडला.
शेतकर्यांनी रक्ताचं पाणी करून आणि घामाचा अभिषेक करून पिकवलेला भाजीपाला या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी होता. शाल, बुकेला फाटा देत फ्लॉवर, मेथी, चाकवत, कोथींबीर, टोमॅटो अशा भाज्यांनी शिगोशिग भरलेली टोपली, ’रयतेचा राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक आणि रोप देऊन जेव्हा आलेल्या पाहुण्यांचे स्वागत झाले तेव्हा या अनोख्या भेटीने सर्वच संबंधित हरखून, आनंदून गेले. शेतमालाला एका समारंभात सर्वोच्च स्थानी ठेवत त्यास प्रतिष्ठा देत शेतकर्यांच्या श्रमाला वंदन करण्यासोबत शेतकरी, कष्टकर्यांच्या प्रतिनिधी म्हणून वयोवृद्ध शेतमजूर झिंगराअक्का कुंभार यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत सन्मानाने बसवून साडीचोळी देऊन केलेला गौरव तमाम शेतकरी, कष्टकरी वर्गासोबत फिनोलेक्स कंपनीचे सर्व अधिकारी, ग्रामस्थ यांच्यासाठी कौतुकाचा विषय झाला.
नवीन दालनाचे उद्घाटन फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे अधिकारी प्रशांत जाधव, विनोद पाटील, सुरेश मोहिते, अमित बगाडे, सरपंच पुष्पा भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, अक्षय यादव, सुधीर भोसले पाटील, महेश शिंदे, पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रगतशील शेतकरी प्रभाकर भोसले, राजेंद्र गायकवाड, नितीन चव्हाण, शशिकांत दगडे, माजी सरपंच अर्जुन भोसले, दिलीप गायकवाड, नामदेव चव्हाण, विजय चव्हाण, विजय डेरे, ग्रा. पं. सदस्य नारायण नलवडे, प्रवीण रोकडे, मदन शिंदे, सेंद्रिय शेती करणारे संजय केंडे, भाऊसाहेब जाधवराव, विनोद भोसले, संदीप भोसले, दीपक भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारे सूर्यकांत प्रभाकर शेटे, साक्षी इरिगेटर्सच्या प्रारंभीचे प्रथम ग्राहक मारुती इंगवले, संजय शिंदे तसेच अॅड. प्रशांत खरे व शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला.
छ. शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिलीप भोसले, अशोक भोसले, सतीश भोसले यांनी सर्वांचे स्वागत केले, जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, आबासाहेब वीर पतसंस्थेचे व्हा. चेअरमन उत्तमराव भोसले यांनी आभार मानले.