‘जल जीवन मिशन अंतर्गत माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कुटुंबांना तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे,’ असे आवाहन जिल्हा परिषद साताराचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले.
वरकुटे : ‘जल जीवन मिशन अंतर्गत माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कुटुंबांना तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे,’ असे आवाहन जिल्हा परिषद साताराचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले.
पंचायत समिती, माण येथे आयोजित जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमुते, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्यासह विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, शाखा अभियंता व पंचायत समिती माणचे पाणी व स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
संतोष धोत्रे म्हणाले, ‘जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र कार्यालय तसेच कुटुंबांना जोडणी उद्दिष्ट मार्चअखेर शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे. तसेच नवीन वाढीव कुटुंबाचे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे. सर्व ग्रामपंचायतींनी घनकचरा सांडपाणी अंतर्गत शंभर टक्के शोष खड्डा मोहीम राबवावी. नवीन सार्वजनिक शौचालय प्रस्ताव सादर करावेत.’
किरण सायमुते यांनी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्व योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत राबवून ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा व शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन उपस्थितांना केले.
सर्जेराव पाटील व सुनील शिंदे यांनी सदरचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विस्तार अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी हृदयनाथ भोईटे यांनी आभार मानले.