गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणार्यावर 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा टाकणार्याचा फोटो काढून पाठविणार्याला 500 रुपये बक्षीस देण्याचेही ठरवण्यात आले.
पाचगणी : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणार्यावर 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा टाकणार्याचा फोटो काढून पाठविणार्याला 500 रुपये बक्षीस देण्याचेही ठरवण्यात आले.
गावात स्वच्छतेत सातत्य राहण्यासाठी अख्खा गाव श्रमदान करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. यावेळी मुख्य रस्त्यासह संपूर्ण परिसराची सफाई करण्यात आली. सर्वांच्या एकजुटीने गावचा परिसर चकाचक होण्यास मदत झाली.
या अभियानात ग्रामसेविका सपना जाधव, सरपंच मंगेश पवार, उपसरपंच विष्णू मालुसरे, माजी सरपंच अंकुश मालुसरे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. हातात झाडू घेऊन महिला व युवक तसेच नागरिकांनी गाव स्वच्छ केला.
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली. यामध्ये गावात उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्या व्यक्तीस दंडाची आकारणी करण्यात येणार असून, जो कचरा टाकण्यास पकडून देईल त्याला प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार असल्याचे एकमताने ठरवण्यात आले.
याच पद्धतीने ग्रामस्थांनी गावात कोरोना प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्क शिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी ग्रामसेविका सपना जाधव म्हणाल्या, ‘गावाचे सौंदर्य अबाधित राखणे, गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे, ही जबाबदारी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांचीही असल्याने युवक व ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबविले. यामुळे संपूर्ण गाव स्वच्छ झाले आहे.’