बिबट्या व बछड्यांची भेट ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
विंग येथे शेतात सापडलेल्या बिबट्याच्या तीन पिल्लांना मादी बिबट्याने सुरक्षित नेले...
Published:Dec 22, 2022 05:34 AM | Updated:Dec 22, 2022 05:34 AM
News By : कराड | संदीप चेणगे
कराड तालुक्यातील विंग येथील तानाजी खबाले यांच्या शेतामध्ये दिनांक वीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊस तोडणी मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले मिळून आली याबाबत तात्काळ वनविभागाशी संपर्क केल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने घटनास्थळी जाऊन तिन्ही पिल्लांना सुस्थितीमध्ये ताब्यात घेतले सायंकाळी पुन्हा त्याच जागी पिल्ले सुस्थितीत ठेवून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले रात्री साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान मादी बिबट्याने ही तिन्ही पिले आपल्या घरी सुरक्षितपणे नेली सदरची घटना वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये कैद झाली आहे या कामी सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे वनक्षेत्रपाल तुषार नवले वनपाल आनंद जगताप वनरक्षक उत्तम पांढरे वन समिती अध्यक्ष तानाजी खबाले वनसेवक भरत पवार अमोल माने वाहन चालक योगेश बेडेकर प्रशिक्षणार्थी सहाय्यक वनसंरक्षक अनिकेत जाधव यांनी परिश्रम घेतले