1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत हिलदारी मार्फत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्यांना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते ‘सेफ्टी किट’च्या वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाबळेश्वर : 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत हिलदारी मार्फत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्यांना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते ‘सेफ्टी किट’च्या वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कोरोना संसर्ग वाढत असताना जोखीम पत्करून आपली जबाबदारी व कर्तव्य नियमितपणे पार पाडणार्या स्वच्छता कर्मचार्यांप्रती आदर, सन्मान व त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हिलदारी मार्फत सर्व स्वच्छता कर्मचार्यांना टप्प्याटप्प्यात सदर कीट देण्यात येणार आहे.
कुठलेही शहर स्वच्छ ठेवण्यात त्या शहरातील स्वच्छता कर्मचार्यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. कोरोनाच्या काळात अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध आहे. पण घन कचरा व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी मात्र अव्याहतपणे शहराचे व शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करत असतात. स्वच्छतेचे काम करत असताना नागरिकांनी कचर्यामध्ये बेपर्वाईने टाकलेल्या फुटलेल्या काचा, घरात वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया, घरात वापरण्यात येणारे विविध केमिकल आदी घातक कचर्यामुळे संबंधित कर्मचार्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हीच बाब लक्षात घेत या ‘सेफ्टी किट’मध्ये चांगल्या प्रतीचे बूट, सुरक्षितरीत्या कचरा हाताळण्यासाठी हँड ग्लोव्हज, रिफ्लेक्टर जॅकेट आदींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कचरा संकलन करणार्या प्रत्येक घंटागाडीमध्ये, डंपर व कचरा प्रक्रिया केंद्र यामध्ये प्रथमोपचार पेटी (First Aid Box) व त्याच्या वापरासंबंधी माहिती हिलदारी मार्फत उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमासाठी महाबळेश्वर नगरपरिषदेचे ढोबळे, स्वच्छता मुकादम मनोज चव्हाण आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.