महाबळेश्‍वर शहरातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

बाधितांमध्ये पालिकेच्या सात कर्मचार्‍यांचा समावेश; पालिका कामकाज काही दिवस बंद 
Published:Aug 13, 2020 12:48 PM | Updated:Aug 13, 2020 12:48 PM
News By : Muktagiri Web Team
महाबळेश्‍वर शहरातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

शहरात आज 32 कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पालिकेतील 7 कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. 32 रुग्णांमुळे शहराची कोरोना रुग्णांची शतकाकडे तर तालुक्याची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालिका कर्मचार्‍यांच्यामुळे पालिकेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.