माणपूर्व भागातील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
Published:Feb 19, 2021 01:13 PM | Updated:Feb 19, 2021 01:13 PM
News By : Muktagiri Web Team
माणपूर्व भागातील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना निवेदन

दुष्काळाच्या विश्रांतीनंतर मागील वर्षी अवकाळीने फटकारलेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विमा, नियमितपणे कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर भत्ता लवकरात लवकर न दिल्यास सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा निर्धार वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत माणच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.