‘पुणे-सातारा महामार्गावर वेळे खंबाटकी घाट पायथ्याला उभा असलेला छत्रपती शिवरायांच्या पन्नास फुटी अश्वारूढ पुतळ्याला व सातारा राजधानी सेल्फी पॉइंटला कोण हात लावेल, त्याची माझ्याशी गाठ आहे. पुतळ्याला स्पर्श केला तरी त्याला किंमत मोजावी लागेल. खबरदार स्वतः मी अश्वारुढ पुतळ्याच्या तिथे उभा राहतो, बघूया कोणाची हिंमत आहे त्या पुतळ्याच्या जवळ यायची,’ असा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. उदयनराजे भोसले यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अतिक्रमण विभागाला दिला.
कुडाळ : ‘पुणे-सातारा महामार्गावर वेळे खंबाटकी घाट पायथ्याला उभा असलेला छत्रपती शिवरायांच्या पन्नास फुटी अश्वारूढ पुतळ्याला व सातारा राजधानी सेल्फी पॉइंटला कोण हात लावेल, त्याची माझ्याशी गाठ आहे. पुतळ्याला स्पर्श केला तरी त्याला किंमत मोजावी लागेल. खबरदार स्वतः मी अश्वारुढ पुतळ्याच्या तिथे उभा राहतो, बघूया कोणाची हिंमत आहे त्या पुतळ्याच्या जवळ यायची,’ असा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. उदयनराजे भोसले यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अतिक्रमण विभागाला दिला.
महाराष्ट्रातील लाखो शिवभक्तांच्या मोबाईलमध्ये आवडीने टिपला गेलेला महामार्गालगत खंबाटकी घाटाचा पायथ्याशी वेळे येथे असलेला पन्नास फुटी अश्वारुढ शिवछत्रपती महाराजांचा भव्य पुतळा व राजधानी सातारा सेल्फी पॉइंट हा अतिक्रमणात येत असल्याच्या नोटीस धाडली गेल्याने राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण पथक पुतळ्याच्यालगत येऊन इतर अतिक्रमणात येणार्या बांधकामांवर बुलडोझर फिरवत असतानाच पुतळ्यालगत अतिक्रमण नियंत्रण येताच स्थानिक शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दंडवत टाकत प्रशासनाला खबरदार पुतळ्याला हात लावला तर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा दिला आहे
यावर सातार्याचे खा. उदयनराजे देखील संतप्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग सातारा पुणे-बंगलोर लगत वेळे खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी गेल्या तीन वर्षांपूर्वी पन्नास फुटी भव्य अश्वारूढ पुतळा उभारला गेला आहे. या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन व सातारा राजधानी सेल्फी पॉइंट अनावरण छत्रपती शिवरायांचे तेरावे थेट वंशज खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मोठ्या दिमाखात करण्यात आले होते.
या भव्य पन्नास फुटी अश्वारुढ पुतळ्याची प्रचिती व राजधानी सातारा सेल्फी पॉइंटची प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात झाली शिवजयंतीपासून आजपर्यंत लाखो शिवभक्तांनी राजधानी सातारा येथे सेल्फी पॉइंट व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये कैद करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, असे असताना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ यांच्या अतिक्रमण पथकाने नवीन बोगद्यापासून येणारे सातारच्या दिशेने जाणारी उजव्या बाजूचे सर्व हॉटेल्स व्यवसाय याचे भूसंपादन करत अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. या लगतच असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्नास फुटी अश्वारुढ पुतळा हा देखील या अतिक्रमणात येत असल्याचा खुलासा यावेळी अधिकार्यांच्या माध्यमातून नोटिसीच्याद्वारे करण्यात आला.
त्यावेळी शिवभक्तांनी या पाठवण्यात आलेल्या नोटिसा याबाबत कमालीचा संताप व्यक्त केला व खबरदार पुतळ्याच्या अवतीभोवती असणार्या साध्या खड्याला देखील हात लावला तर याठिकाणी शिवभक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली आत्मसमर्पण करत अंगावर बुलडोझर फिरवला तरी रक्ताचे पाट वाहत तोपर्यंत बाजूला हलणार नाहीत, असा इशारा शिवभक्तांनी यावेळी दिला.
यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. कायदा, सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यासह पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होता.
मात्र, पोलीस खात्याच्या समोरच शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर साक्षात झोपून महाराजांच्या चरणी दंडवत घातला व त्यानंतर जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जोरदार जल्लोष करत व जय घोषणा देत खबरदार पुतळ्याला हात लावाल तर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा रस्ते विकास महामंडळाच्या अतिक्रमण पथकाला दिला आहे. त्यामुळे आता रस्ते विकास महामंडळाचे पथक व महसूल प्रशासनाला पुतळ्याला हात लावताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.
या ठिकाणी आता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज 100 पेक्षा अधिक शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी उभे राहिले होते. यावेळी प्रत्येक शिवभक्ताच्या चेहर्यात डोळ्यात रस्ते विकास महामंडळाच्या या जुलमी कारभाराच्या विरोधात संताप दिसून आला. त्यामुळे उद्याच्या होणार्या राष्ट्रीय विकास रस्ते महामंडळाच्या या जुलमी कारभाराच्या विरोधात भव्य आंदोलन निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.
आज वेळे येथील काही व्यावसायिकांनी देखील हा जुलमी कारभार आमच्यावर होत आहे, प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी, आमचे कुटुंब उघड्यावर पडू लागले आहे, आमचे व्यवसाय तोडले गेले आहेत, अशा भावनिक प्रतिक्रिया देत व्यावसायिकांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले. मात्र, असे असताना देखील रस्ते विकास महामंडळाच्या बुलडोजर मात्र यावेळी व्यवसाय व हॉटेल्सवर फिरतच राहिला.