महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांना आसरा देणार्‍या हॉटेलवर कारवाई

पालिकेच्या विशेष पथकाने 55 हजारांचा दंड केला वसूल
Published:4 y 6 m 23 hrs 4 min 3 sec ago | Updated:4 y 6 m 23 hrs 4 min 3 sec ago
News By : Muktagiri Web Team
महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांना आसरा देणार्‍या हॉटेलवर कारवाई

जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्‍वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्‍या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातून चांगलेच कौतुक केले जात आहे.