कराड ः सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी हीच खरी भाजपची ताकद आहे, पक्ष नेहमीच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला, पालिका निवडणुकीत ती ताकद दाखवून विजय खेचून आणण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकऱ बावनकुळे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष एखनाथ बागडी यांनी बावनकुळे यांचा शाल,. श्रीफल देवून सत्कार केला यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, सौ. सुमन बागडी, प्रमोद शिेद, प्रशांत कुलकर्णी उपस्थीत होते. श्री. बावनकुळे म्हणाले, कार्यकर्ते हेच पक्षाची ताकद आहेत. कार्यकर्त्यांनीही पक्षाची सारी ध्येय धोरणे सामान्यपर्यंत पोचवली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना अधिकाधिक लोकापर्यंत पोचविण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील १५० देशांनी त्यांना आपला नेता मानले आहे. जगभरात विश्वगुरु म्हणून त्यांना ओळखले जात असून, येत्या काळात जगाचे नेतृत्व भारताकडे राहणार आहे. यासाठी आपण सर्व समाजबांधवांनी आपल्या कुटुंबातील मुलांना उच्चशिक्षित करुन, त्यांना देशविकासात योगदान देण्यासाठी तयार करावे. यावेळी जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांचेही भाषण झाले. श्री.बागडी यांनी आभार मानले.