‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित, बौद्धांचे नेते असून त्यांनी फक्त दलितांसाठी काम केले, हा जो इतर धर्मियांमध्ये गैरसमज आहे तो आज 74 वर्षे झाली तरी फुसला जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. खरेतर या महामानवाने पृथ्वी तलावर असलेल्या अठरापगड जाती जमातीच्या पुरुष, महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार महिला पुरुष यांचे हक्क घटनेच्या माध्यमातून मिळवून देणारे जगातील एकमेव घटनापती आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,’ असे मत पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी व्यक्त केले.
म्हसवड : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित, बौद्धांचे नेते असून त्यांनी फक्त दलितांसाठी काम केले, हा जो इतर धर्मियांमध्ये गैरसमज आहे तो आज 74 वर्षे झाली तरी फुसला जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. खरेतर या महामानवाने पृथ्वी तलावर असलेल्या अठरापगड जाती जमातीच्या पुरुष, महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार महिला पुरुष यांचे हक्क घटनेच्या माध्यमातून मिळवून देणारे जगातील एकमेव घटनापती आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,’ असे मत पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी व्यक्त केले.
म्हसवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे व पीएसआय विशाल भंडारेे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बाहेरील मूर्तींचे महेश लोखंडे, धनाजी तुपे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. बौद्धाचार्य कुमार सरतापे यांनी बुद्ध वंदना घेतली यानंतर श्रेया गोपाल बनसोडे हिने बाबासाहेब यांच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणात घेतला.
या कार्यक्रमाला महिला, लहान मुले आणि बौद्ध बांधव उपस्थित होते. तसेच जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 35 नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी मोठ्या प्रमाणात आंबेडकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, महात्मा फुले चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व म. फुले यांच्या पुतळ्यास राज्याचे आयकर आयुक्त मुंबई व बनगरवाडीचे सुपुत्र डॉ. नितीन वाघमोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा. विश्वंभर बाबर, विकास गोंजारी, एल. के. सरतापे, सचिन सरतापे, सचिन लोखंडे, महेश लोखंडे, अंगुली बनसोडे, कुमार सरतापे, शिवदास सरतापे आदी उपस्थित होते.