संत निरंकारी मिशनद्वारे स्वच्छ जल- स्वच्छ मन अभियान अंतर्गत कराड प्रीतीसंगम स्वच्छता मोहीम.
News By : Muktagiri Web Team

संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक जनजागृती बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण, रक्तदान शिबिर ,संपूर्ण देशातील रेल्वे स्टेशन स्वच्छता, व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य .असे अनेक उपक्रम प्रतिवर्षी संपूर्ण देशात व देशाबाहेर राबविले जातात. अशाच पद्धतीने आज 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रोजेक्ट अमृत अंतर्गत "स्वच्छ जल ,-स्वच्छ मन" ही परियोजना संपूर्ण भारतभर सत्तावीस राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास एक हजार ठिकाणी राबविण्यात आली. तर महाराष्ट्रात एकूण 96 ठिकाणी ही परियोजना राबविण्यात आली यामध्ये समुद्रकिनारे ,नद्या ,सरोवरे ,तलाव, विहिरी ,झरे, पाण्याच्या टाक्या ,नाले आणि जलप्रवाह इत्यादी ठिकाणी स्वच्छता करून ते निर्मळ बनविण्यात आले. संत निरंकारी मिशन च्या प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेव जी महाराजांच्या असीम कृपेने व सातारा झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे( दादा)यांच्या मार्गदर्शनाखाली व सेवा दल क्षेत्रीय अधिकारी दीपक शेलार यांच्या उपस्थितीत कराड प्रीतीसंगमावरती स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण समाधी परिसर व संपूर्ण नदीकाठचा परिसर सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत स्वच्छ करण्यात आला. यावेळी सेक्टर संयोजक प्रल्हाद मोरे व त्यांचे सहयोगी श्री राजेंद्र गव्हाणे उपस्थित होते. यामध्ये संत निरंकारी मिशनच्या कराड ,पाटण, ढेबेवाडी, तारळे ,चाफळ ,रेठरे खुर्द ,नांदगाव, पुसेसावळी, वडूज , कातरखटाव व मायणी इत्यादी शाखांनी सहभाग घेतला होता. या सर्व शाखांचे मुखी, सेवा दल अधिकारी बंधू-भगिनी, यासह हजारो संत निरंकारी अनुयायी उपस्थित होते. या परियोजनेसाठी मिलिंद शिंदे (आरोग्य निरीक्षक -कराड नगरपरिषद )श्आशिष रोकडे (शहर समन्वयक स्वच्छता भारत अभियान कराड नगरपरिषद ) विजय वाटेगावकर माजी नगरसेवक व सौरभ पाटील माजी नगरसेवक ,कराड नगरपरिषद आरोग्य विभागाचे अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी अतुल भोसले कृष्णा बँक अध्यक्ष व भाजपा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सरचिटणीस, आनंदराव पाटील माजी आमदार या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली व संत निरंकारी मिशनच्या या महान कार्याचे भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कराड ब्रांच मुखी दिलीप कोरडे , सहयोगी काळे , सेवादल संचालक डॉ. प्रकाश पाटील, भास्कर माळी व सर्व सेवादलअधिकारी यांनी अतिशय सुंदर रित्या या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शेवटी दुपारी बारा वाजता सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराजांचे ऑनलाइन आशीर्वाद प्राप्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.