अत्यंत अटीतटीने लढलेल्या पानवन ग्रामपंचायतीमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पुन्हा एकदा गजर दुमदुमला. अकरापैकी सात उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री नानासो शिंदे यांची सरपंचपदी तर चांगुना रायचंद शिंदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सरपंचपद सर्वसाधारण खुले असताना सरपंच व उपसरपंच पदी महिलांना संधी देऊन पानवन राष्ट्रवादीने नवा आदर्श घालून दिला आहे.
म्हसवड : अत्यंत अटीतटीने लढलेल्या पानवन ग्रामपंचायतीमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पुन्हा एकदा गजर दुमदुमला. अकरापैकी सात उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री नानासो शिंदे यांची सरपंचपदी तर चांगुना रायचंद शिंदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सरपंचपद सर्वसाधारण खुले असताना सरपंच व उपसरपंच पदी महिलांना संधी देऊन पानवन राष्ट्रवादीने नवा आदर्श घालून दिला आहे.
निवडणुकीपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न झाल्यामुळे ही निवडणूक मोठ्या अटीतटीने लढली गेली. माण तालुका बाजार समितीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे, माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, डॉ. नानासाहेब शिंदे, संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व संदिपान तोरणे, पोपट शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पानवन ग्रामपंचायतीमध्ये 7 -4 असे घवघवीत यश मिळवले.
निवडीवेळी जयश्री शिंदे व चांगुना शिंदे यांचे दोनच अर्ज आल्याने आणि विरोधी गटातील सदस्य अनुपस्थित राहिल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.
यावेळी सत्ताधारी गटाच्या माधुरी विकास तोरणे, धनाजी श्रीमंत शिंदे, राजू भीमा तुपे, गोविंदा वसंत शिंदे, विजया हनमंत नरळे आदी सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायत विजयासाठी जगू वामन शिंदे, आप्पा नरळे, भगवान गोरवे, तुळशीराम तुपे, विशाल तोरणे, चंद्रकांत तोरणे, बापू नरळे, नागेश नरळे, पांडुरंग शिंदे, बबन चव्हाण, उत्तम चव्हाण, दत्तू नरळे, मामासाहेब शिंदे यांनी परिश्रम घेतले.
नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सुभाष नरळे, डॉ. संदीप पोळ आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.