माण तालुका सेवानिवृत्त संघटनेमार्फत कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून दोन लाखांचा धनादेश माणच्या तहसीलदार बाई माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
म्हसवड : माण तालुका सेवानिवृत्त संघटनेमार्फत कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून दोन लाखांचा धनादेश माणच्या तहसीलदार बाई माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी निधी स्वीकारल्यानंतर बाई माने यांनी सर्व सेवानिवृत्त संघटनेचे आभार मानले. त्या म्हणाल्या, ‘सध्या कोरोनामुळे राज्य सरकारला निधीची गरज असताना माण तालुका सेवानिवृत्त संघटनेने फार मेहनत करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाखांचा निधी दिला आहे, ही बाब खरंच कौतुकास्पद आहे.’
सदर निधी संकलन करण्यासाठी माण तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त कुटुंब निवृत्ती वेतन दरात शिक्षक व शिक्षकेतर पेन्शनधारकांकडून जमा झालेल्या दोन लाख रुपये रकमेचा धनादेश माणच्या तहसीलदार बाई माने यांच्याकडे देण्यात आला.
निधी जमा करण्यासाठी माण तालुका सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष बापूराव जगदाळे, कार्याध्यक्ष हनुमंतराव भोसले, उपाध्यक्ष विलासराव जोशी, बबन कुंभार, सरचिटणीस विश्वास जगदाळे, सचिव पांडुरंग काशीद यांनी आवाहन केले व निधी संकलनासाठी विभागवार प्रतिनिधी म्हणून नंदकिशोर केसकर, शंकरराव शिंदे, हनुमंतराव चव्हाण, अनंत पोळ, भानुदास जगदाळे, राजाराम साखरे, अरुण गोसावी, तातोबा बनसोडे, दादासो भोसले, जनार्दन खरात, साहेबराव फडतरे, शंकर माळवी, सुरेश काशीद, रामहरी जाधव आदी सेवांवर त्यांनी निधी संकलनासाठी अथक प्रयत्न केले व दोन लाखांचा निधी जमा केला.
या सर्वांचे संघटनेचे सचिव पांडुरंग काशीद यांनी आभार मानले.