येथील शंभू महादेव देवस्थानच्या ठिकाणी प्रसिद्ध असे गुप्तलिंग आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात. तसेच सुमारे तीन किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले धार्मिक ठिकाण असल्याने गुप्तलिंग या ठिकाणाला शिवकालिन व ऐतिहासिक वारसा असल्याने ते आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. गुप्तलिंगच्या आजूबाजूच्या डोंगरभागातून छोटे-छोटे धबधबे पावसाळ्यात वाहतात. त्यामुळे हा परिसर मनमोहित करणारा आहे. याचा मनमुराद आनंद शिवभक्त पर्यटक घेत असतात. मात्र, सध्या गुप्तलिंग मंदिराकडे जाणार्या पायरी
शिखर शिंगणापूर : येथील शंभू महादेव देवस्थानच्या ठिकाणी प्रसिद्ध असे गुप्तलिंग आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात. तसेच सुमारे तीन किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले धार्मिक ठिकाण असल्याने गुप्तलिंग या ठिकाणाला शिवकालिन व ऐतिहासिक वारसा असल्याने ते आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. गुप्तलिंगच्या आजूबाजूच्या डोंगरभागातून छोटे-छोटे धबधबे पावसाळ्यात वाहतात. त्यामुळे हा परिसर मनमोहित करणारा आहे. याचा मनमुराद आनंद शिवभक्त पर्यटक घेत असतात. मात्र, सध्या गुप्तलिंग मंदिराकडे जाणार्या पायरी मार्गाची पडझड झाली असून, संरक्षक कठड्यासह लोखंडी रॅलिंग ढासळला आहे.
या पडझडीमुळे शिवभक्तांच्या सुरक्षिततेची समस्या निर्माण झाली असून, बांधकाम विभागाने पायर्या मार्गासह संरक्षक कठड्याची दुरुस्ती करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिंगणापूर ग्रामस्थांसह भाविक, पर्यटकांनी केली आहे.
बांधकाम विभागाने पाहणी करून डागडुजी करावी
कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने सध्या शिवभक्त व पर्यटक मंदिर परिसरात येत नाहीत. मात्र, पुढील काळात मंदिरे देवदर्शनासाठी खुली करण्याच्या अगोदर गुप्तलिंग पायरी मार्गाच्या डागडुजीचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. कारण, पडझड झालेल्या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणची पाहणी करून पायरी मार्गाची दुरुस्ती करावी.
- पवन कुदळे, वैद्यकीय संशोधक