कोरोना या महामारीची दहशत गेल्या वर्षी पासून माण तालुका भोगत आहे. गत मार्चमध्ये म्हसवड व परिसरात कोरोनाची मोठी दहशत होती.आठ महिने म्हसवड व परिसरातील नागरिकांनी या महामारीची दहशत मनावर घेत 35 लोकांचे जीव घेतल्यानंतर या महामारीने आपला मोर्चा दहिवडी व परिसराकडे वळवला. दहिवडीत म्हसवड पेक्षा मोठी दहशत होती. या दहशतीने दहिवडीत डोकेवर काढल्याने माण तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूच्या संख्येने शतक पार करून 141 आकडा गाठला असताना पुन्हा या कोरोनाने दुसर्या लाटेत आपला मोर्चा म्हसवडकडे वळवून म्हसवडकरांची झो
म्हसवड : कोरोना या महामारीची दहशत गेल्या वर्षी पासून माण तालुका भोगत आहे. गत मार्चमध्ये म्हसवड व परिसरात कोरोनाची मोठी दहशत होती.आठ महिने म्हसवड व परिसरातील नागरिकांनी या महामारीची दहशत मनावर घेत 35 लोकांचे जीव घेतल्यानंतर या महामारीने आपला मोर्चा दहिवडी व परिसराकडे वळवला. दहिवडीत म्हसवड पेक्षा मोठी दहशत होती. या दहशतीने दहिवडीत डोकेवर काढल्याने माण तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूच्या संख्येने शतक पार करून 141 आकडा गाठला असताना पुन्हा या कोरोनाने दुसर्या लाटेत आपला मोर्चा म्हसवडकडे वळवून म्हसवडकरांची झोप उडवली आहे. त्यामुळे म्हसवडमध्ये बाधित एकूण संख्या 1 हजार 745 झाली असून, मृत्यूचा आकडा 47 वर गेला आहे. आज स्मशानभूमीत पाच मृतांना अग्नी देण्यासाठी वेटिंगला थांबावे लागले होते.
गेले चार महिने कोरोनाची दहशत कमी झाली म्हणजे जणू काय कोरोना गेला या आविर्भावात म्हसवड व परिसरातील नागरिक, पोलीस, पालिका प्रशासन बेफिकिरीने वागत होते. दुसर्या लाटेचा प्रभाव जस जसा दिसू लागला तस तशी शासकीय कोविड दवाखाना सीसीमध्ये 70 ते 75 कोरोना बाधित उपचार घेत आहेत व डिसीएचसी हे आम्ही म्हसवडकर ग्रुपचे ऑक्सिजनचे 17 ब्रेडचे शासकीय हॉस्पिटलही फुल्ल झाले असून, खासगी दोन्ही हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाल्याने बेड कोठेच शिल्लक नाही, अशी अवस्था म्हसवड व परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची झाली आहे. तसेच सातारा जिल्ह्यात नव्हे तर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, माळशिरस, अकलूज येथेही बेड उपलब्ध होत नसल्याने व रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
जिल्हाधिकार्यांनी तत्काळ कोरोना सेंटरला औषधांचा साठा व रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन बेडची व्यवस्था करण्याची मागणी आम्ही म्हसवडकर ग्रुपने पालकमंत्री, जिल्हाधिकारी सातारा, प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. काल माण-खटाव तालुक्याचे प्रांताधिकार्यांना म्हसवडची वाढती बाधित संख्या यामुळे म्हसवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ राबवण्याच्या सूचना दिल्याने त्याची अंमलबजावणी आज मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी कर्मचारी वर्गाला सूचना करून म्हसवड बसस्थानक, म. फुले चौक, रथगृहाजवळ, मरिमाता मंदिर, डेड हॉस, पंढरपुरी नाका, सिद्धनाथ हायस्कूल नजीक व गावडे हॉस्पिटल समोर बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केल्याने नागरिकांना आत-बाहेर जाता येत नव्हते. त्यामुळे आजच्या पहिल्या ‘जनता कर्फ्यू’ची दहशत पोलिसांनी व पालिकेने चांगलीच बसवली आहे.
माण तालुक्यातील पाच मंडलातील एकूण बाधित, बरे झालेले, उपचार व मृत्यू पुढीलप्रमाणे : मलवडी : एकूण रुग्ण 534, बरे रुग्ण 432, उपचार सुरू असलेले 72, एकूण मृत्यू 31. मार्डी : एकूण बाधित 1287, बरे रुग्ण- 1082, उपचार सुरू 180, एकूण मृत्यू 25. पळशी : एकूण रुग्ण 730, बरे रुग्ण 581, उपचार सुरू 128, मृत्यू 21. पुळकोटी : एकूण बाधित 399, बरे रुग्ण 270, उपचार सुरू 115, मृत्यू 14. म्हसवड : एकूण बाधित 1625, बरे रुग्ण 1153, उपचार सुरू 394, मृत्यू 44 याप्रमाणे माण तालुक्यात एकूण बाधित 4541, बरे झालेले 3518, उपचार सुरू असलेले 888 तर एकूण मृत्यू 141 झाले आहेत.