बचावलेल्याचा जबाबवरून तपास पोलिस निरिक्षक फुलंचद मेंगडे यांनी या दुर्घटनेत बचावलेला तुषार याच्याकडे चौकशी सुरू करत आहेत. त्याने सांगितलेल्या हकीकतीवरून पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी प्राथमिकनुसार तपास सुरू केला असून सर्वच घटनांचा ते मागोवा घेत आहेत.
वीट भट्टीच्या व्यवहारातून पैसे मागताना एकाचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कारमध्येच मृत्यू झाल्याने घाबरलेल्या दोघांनी तो मृतदेह कोकणातील आंबोली (जि. सिंधुदुर्ग) घाटाच्या दरीत टाकण्यास नेला. दरीत मृतदेह टाकणार्यापैकी एकाचा दरीच्या कट्टट्यावरून पाय घसरल्याने तोही मृतदेहासोबत दरी कोसळला. त्या दुर्घटनेत त्याचाही मृत्यू झाला. घटनेची नोंद सिंधुदुर्ग पोलिसात झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब अरुण माने (वय 25 रा. गोळेश्वर ता. कराड) याने सुशांत खिल्लारेला दोन लाख रूपये दिले होते. वर्षभर तो पैसे व सांगितलेले कामही करत नसल्याने भाऊसाहेब यांनी आपला मित्र तुषार पवार यांच्यासोबत सुशांत खिल्लारेला कराडहून निर्जनस्थळी बोलावले. व्यवहाराचे काय झाले असे विचारणा केली. तसेच त्याला मारहाण केली. तुषार पवार व भाऊसाहेब माने यांनी सुशांत याला मारहाण केली. त्यात सुशांतचा मृत्यू झाल्याने दोघेही घाबरले. त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली गाठली. ते मृतदेहासह आंबोली घाटात पोचले. आंबोली घाटातील मुख्य धबधबा पासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटरवर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्रीच्या आठच्या सुमारास मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर काढला. संरक्षक कठड्यावर उभे राहिले. नेमका मृतदेह फेकताना सुशांतचा मृतदेह तर खाली फेकला गेलाच परंतु त्याच वेळेस तोल गेल्याने भाऊसाहेब मानेही दरीमध्ये कोसळला. परंतु तुषार मात्र यातून बचावला त्याने स्वतःला सावरले व तो वरच राहिला तुषारने आपला मित्र भाऊसाहेबला हाका मारल्या. परंतु कोणताही उपयोग झाला नाही तुषारने चालू असलेली गाडी तशीच पुढे पूर्वीचा वस मंदिर येथे आणली. गाडी बंद केली. त्यानंतर तुषारने घडलेला प्रकार भाऊसाहेबाच्या नातेवाईकांना सांगितला. त्यांनी लागलीच पोलिसांना खबर दिली. दुपारी एकच्या सुमारास आंबोली पोलिसांना याबाबत कराड पोलिसांकडून माहिती घेत तत्काळ आंबोली पोलीस व आंबोली रेस्क्यू टीम मार्फत घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळी शोधत असताना रेस्क्यू टीमला दोन मृतदेह आढळून आले सायंकाळी चार वाजेपर्यंत दोन्ही मृतदेहवर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले आहेत. सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक नाईक दीपक शिंदे, दर्शन सावंत, श्री.पाटील आंबोली रेस्क्यू टीमचे मायकल डिसूजा, उत्तम नार्वेकर, हेमंत नार्वेकर, विशाल बांदेकर, संतोष पालेकर, राजू राऊळ, अजित नार्वेकर आदी उपस्थित होते