‘बँकिंग ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून दि वाई अर्बन को. आँप. बँकेने शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आकर्षक (डायनॅमिक) वेबसाईट बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. विनय जोगळेकर यांच्या हस्ते सुरू केली आहे. बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार व हितचिंतक यांनी नव्या आकर्षक स्वरूपातील वेबसाईटला अवश्य भेट द्यावी,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले.
वाई : ‘बँकिंग ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून दि वाई अर्बन को. आँप. बँकेने शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आकर्षक (डायनॅमिक) वेबसाईट बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. विनय जोगळेकर यांच्या हस्ते सुरू केली आहे. बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार व हितचिंतक यांनी नव्या आकर्षक स्वरूपातील वेबसाईटला अवश्य भेट द्यावी,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले.
वाई येथे बँकेच्या नवीन वेबसाईटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, ज्येष्ठ संचालक डाँ. विनय जोगळेकर व मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
चंद्रकांत काळे म्हणाले, ‘बँकेने 2014 मध्ये नवीन वेबसाईट सुरू केली होती. त्यामध्ये शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आधुनिक बदल केले आहेत. वेबसाईटवर बँकेच्या सर्व शाखांची तसेच विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती, वार्षिक अहवाल, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्यांची माहिती तसेच अधिकारी वर्गाची माहिती प्रसिध्द करण्यात आली होती. बदलत्या काळानुसार बँकेने विविध उपक्रम राबविले आहेत. याची माहिती वेबसाईटवर प्रसिध्द करणे आवश्यक होते. त्यानुसार वेळोवेळी वेबसाईटमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या डायनॅमिक वेबसाईटमध्ये विविध रंगीत स्लाईडस, ठेव व कर्ज योजनांची अद्ययावत माहिती, बँकेच्या विविध सामाजिक व बँकिंग उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.’
ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बँकेने ही वेबसाईट जेए सोल्यूशन्सचे अलंकार जाधव यांच्याकडून तयार करून घेतली आहे. आगामी काळात मोबाईल बँकिंग, अँपव्दारे ग्राहकांना बँकिंगच्या विविध सेवा लवकरच देण्याचा बँकेचा मानस आहे. त्यादृष्टीने बँकेने रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवला आहे. सध्या बँकेच्या खातेदारांना आरटीजीएस, एनईएफटीची सुविधा मिळत आहे. दि. 27 नोव्हेंबर 2020 पासून बीएसजी कंपनीचे टुरिंग साँफ्टवेअर सुरू केले आहे. त्यामाध्यमांतून ग्राहकांना तत्पर सेवा व आधुनिक बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेची ई-काँमर्स सेवा कार्यान्वित असून त्यामाध्यमांतून ग्राहकांना वीज बिले भरणे, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिले, डीटीएच रिचार्ज, फास्टॅग रिचार्ज आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ग्राहकांनी बँकेच्या रूपे कार्डच्या मदतीने या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले आहे.
वेबसाईट लाँचिंग कार्यक्रमास बँकेचे संचालक मदनलाल ओसवाल, अॅड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, अॅड. सीए. राजगोपाल द्रविड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, अंजली शिवदे, गीता कोठावळे, तज्ज्ञ संचालक किशोरकुमार मांढरे, अनिल देव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल, जेए सोल्यूएशनचे अलंकार जाधव आदी उपस्थित होते.