‘केळघर परिसरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रशासनास ग्रामस्थांची साथ मिळाल्यास कोरोना हद्दपार होण्यास फारसा अवधी लागणार नाही. केळघर परिसरात कोरोनामुक्तीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विचारमंच सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनारूपी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.
केळघर : ‘केळघर परिसरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रशासनास ग्रामस्थांची साथ मिळाल्यास कोरोना हद्दपार होण्यास फारसा अवधी लागणार नाही. केळघर परिसरात कोरोनामुक्तीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विचारमंच सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनारूपी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.
केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व समाजसेवक ज्ञानदेव रांजणे यांच्या सूचनेनुसार युवा उद्योजक सागर धनावडे यांच्या वतीने मास्क व रोगप्रतिकारक गोळ्या वाटपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, विस्तार अधिकारी ए. पी. पवेकर, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, शिक्षक बँकेचे संचालक शंकर जांभळे, उद्योजक सचिन पार्टे, उद्योजक सागर धनावडे, सरपंच रवींद्र सल्लक, ग्रामसेवक शिवाजी निर्मल, नितीन जाधव, बापू शेलार, संतोष कासुर्डे, लहुराज सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विचारमंचच्या वतीने तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे, आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांसाठी मास्क व रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी समाजसेवक रांजणे म्हणाले, ‘आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू तसेच आवश्यक औषधे यांचा पुरवठा देऊन दिलासा देण्याचे काम केले आहे. नागरिकांनी साखळी खंडित होण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.’
सागर धनावडे यांनी स्वागत केले.