सध्या सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यातही रुग्णांना लागणार्या ऑक्सिजनच्या अपुर्या साठ्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याने स्वत:चा व्यवसाय काही दिवस बंद ठेवावा लागला तरी चालेल; परंतु कोविड रुग्णांचे प्राण वाचले पाहिजेत, या सामाजिक बांधिलकीतून गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील व्यावसायिक आत्माराम कदम यांनी ऑक्सिजन सिलिंडर दान करून रुग्णांना वाचवण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे.
वडूज : सध्या सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यातही रुग्णांना लागणार्या ऑक्सिजनच्या अपुर्या साठ्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याने स्वत:चा व्यवसाय काही दिवस बंद ठेवावा लागला तरी चालेल; परंतु कोविड रुग्णांचे प्राण वाचले पाहिजेत, या सामाजिक बांधिलकीतून गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील व्यावसायिक आत्माराम कदम यांनी ऑक्सिजन सिलिंडर दान करून रुग्णांना वाचवण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व श्री महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणारे गोंदवले बुद्रुक येथील निवेदिता ट्रेलर्स वर्क्सचे प्रो. प्रा. व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम कदम (दादा) यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सध्या कोविड रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज असल्याने व ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने त्यांनी त्यांचे वर्कशॉप बंद ठेवून वर्कशॉपच्या कामासाठी आणलेले अकरा ऑक्सिजन सिलिंडर माणमधील रुग्णांच्या अनमोल जीवदानासाठी माण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्याकडे सुपूर्द केले. यामुळे या सिलिंडरच्या माध्यमातून अनेक रुग्णांना दिलासा मिळणार असून, त्यांना नवसंजीवनी देण्याचं काम आत्माराम कदम यांनी केलं आहे. या योगदानाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, आंधळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार, माण तालुका मार्केट कमिटीचे सदस्य तानाजी मगर व भैया कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत भैय्या कदम यांनी केले. बाबासाहेब पवार यांनी आभार मानले.