‘शेतकर्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन माण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील यांनी केले.
वरकुटे : ‘शेतकर्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन माण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील यांनी केले.
मोटेवाडी येथील शेतकरी पांडुरंग मोटे यांच्या शेतात रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सरपंच मारुती मोटे, सदस्य दत्तात्रय तुपे व इतर शेतकरी उपस्थित होते.
श्रीराम पाटील म्हणाले, ‘शासनाच्या योजना सामान्य शेतकरीवर्गापर्यंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे योजनांचा लाभ शेतकरी वर्गाने घेऊन आपली सर्वांगीण प्रगती साधावी.’
यावेळी सागर बनगर, बाबजी मोटे, शरद जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.