सभासद शेतकर्‍यांच्या बळावरच मार्गक्रमण करू 

मदन भोसले यांचे प्रतिपादन : ‘किसनवीर’ची 49वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न 
Published:4 y 5 m 9 hrs 6 min 39 sec ago | Updated:4 y 5 m 9 hrs 6 min 39 sec ago
News By : Muktagiri Web Team
सभासद शेतकर्‍यांच्या बळावरच मार्गक्रमण करू 

‘किसन वीर साखर कारखाना यंदा आपला 50वा गळीत हंगाम साजरा करीत आहे. कारखान्याची सूत्रे शेतकरी सभासदांच्या विश्‍वासावर हाती घेतल्यानंतर सभासद, कर्मचारी आणि कारखान्यासाठी उपयुक्त घटकांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे कार्यस्थळावर अनेक नवनवीन प्रकल्प उभे करता आले. याचा विशेष आनंद मला व माझ्या व्यवस्थापनास आहे, परंतु गेल्या काही वर्षात साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. नैसर्गिक आणि आर्थिक संकटामुळे आपल्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झाला. या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी सभासद व कामगारांन