शासकीय कृषी महाविद्यालय, कराड अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2020 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कराडच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदूत अभिजित लालासाहेब राऊत व सुजय शंकर घनवट यांनी माण तालुक्यात डंगिरेवाडी (मोही) या गावामध्ये शेतकर्यांना विविध पिकासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी त्यांनी विविध इंटरनेट अॅपच्या माध्यमातून पिकावरील रोग किडी कशा ओळखाव्यात याची माहिती दिली.
बिदाल : शासकीय कृषी महाविद्यालय, कराड अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2020 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कराडच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदूत अभिजित लालासाहेब राऊत व सुजय शंकर घनवट यांनी माण तालुक्यात डंगिरेवाडी (मोही) या गावामध्ये शेतकर्यांना विविध पिकासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी त्यांनी विविध इंटरनेट अॅपच्या माध्यमातून पिकावरील रोग किडी कशा ओळखाव्यात याची माहिती दिली. यामध्ये कृषी सल्ला चर्चासत्र, विविध पीक प्रात्यक्षिक, जनावरांचे लसीकरण व शिबीर, त्याच्यासोबत कृषीसंबंधी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
महाराष्ट्र शासनाचे व कृषी महाविद्यालय कराड यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल शेतकर्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच ग्रामीण भागात उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी शेतकर्यांनी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
यावेळी शासकीय कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालय कराडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस. कोळपे, प्रा. आर. एच. हंकारे व कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. एस. नावडकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डंगिरेवाडी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.