म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नसून शनिवारी पुन्हा शहरात 13 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून यामध्ये 8 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला असून, त्या परिसरात म्हसवड पालिकेच्यावतीने निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे.
म्हसवड : म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नसून शनिवारी पुन्हा शहरात 13 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून यामध्ये 8 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला असून, त्या परिसरात म्हसवड पालिकेच्यावतीने निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे.
शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे म्हसवडकर नागरिक भयभीत झाले असून कोरोनाची ही साखळी कधी थांबणार, असा सवाल म्हसवडकर जनतेतून उपस्थित होत आहे. शहरात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी (दि. 22) पालिका नगरसेवकांनी एकत्र येत शहरवासीयांना सोमवार, दि. 24 पासून 5 दिवस कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले असून जनतेनेही त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, शनिवारी (दि. 22) शहरातील शिवाजी चौक येथील 60 वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी येथील 38 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील 39 वर्षीय पुरुष, सुतार गल्ली येथील 48 वर्षीय पुरुष व अन्य एका ठिकाणच्या 19 वर्षीय युवतीसह येथील आंबेडकरनगर येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला तर येथील खासबाग मळा परिसरातील 55 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगी व 8 वर्षीय मुलगा या सर्वांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य एकाचा कोरोना अहवाल हा येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पालिकेकडून शहरात निर्जंतुकीकरण फवारणी
शहरात दररोज वाढणार्या कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी म्हसवड पालिकेने खबरदारी म्हणून संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरणाची मोहीम सुरू केली असून, पालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे शहरातील मुख्य बाजारपेठेत फवारणी सुरू केली आहे. तर छोट्या गल्ल्यांमध्ये छोट्या वाहनाद्वारे फॉगिंग सुरू केले आहे.