येथील दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांना सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नुकतेच नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अॅचिव्हमेंट फाउंडेशनचा भारत निर्माण पुरस्कार मिळाला आहे. स्टर्लिंग मेरीट एक्सलंट परफॉरमन्स अॅड आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्ड ऑप को. ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, माजी अध्यक्ष व वाई अर्बन परिवाराचे प्रमुख अरूण देव यांच्या हस्ते चावलानी यांचा सत्कार
वाई : येथील दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांना सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नुकतेच नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अॅचिव्हमेंट फाउंडेशनचा भारत निर्माण पुरस्कार मिळाला आहे. स्टर्लिंग मेरीट एक्सलंट परफॉरमन्स अॅड आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्ड ऑप को. ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, माजी अध्यक्ष व वाई अर्बन परिवाराचे प्रमुख अरूण देव यांच्या हस्ते चावलानी यांचा सत्कार करण्यात आला.
राजेंद्र चावलानी गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी वाई अर्बन बँकेचे संचालक म्हणून 15 वर्षे काम केले असून, 7 वर्ष बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांचे बांधकाम व्यवसाय, गव्हर्मेंट कॉन्ट्रक्टर, औषधे विक्री आदी विविध व्यवसाय आहेत. त्याचबरोबर दि वाई अर्बन को. ऑप. बँकेच्या माध्यमातून त्यांचा सहकार क्षेत्राशी गेल्या अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या गत 15 वर्षांच्या सहकार क्षेत्रातील कार्याचा विचार करून नवी दिल्लीतील प्रमोटिंग अॅचिव्हमेंट फाउंडेशनने त्यांना पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. स्मृतिचिन्ह, मेडल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना चावलानी म्हणाले, ‘कै. पोपटशेठ ओसवाल व वाई अर्बन परिवाराचे मान्यवर यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच मला बँकेच्या माध्यमातून सहकारात प्रदीर्घ काम करण्याची संधी मिळाली. सर्वांच्या सहकार्यामुळे मी बँकेचा संचालक म्हणून समर्थपणे धुरा सांभाळू शकलो.’
पुरस्काराबद्दल वाईतील मान्यवरांनी राजेंद्र चावलानी यांचे अभिनंदन केले. वाई अर्बन बँकेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे संचालक विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, अॅड. सीए. राजगोपाल द्रविड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, अंजली शिवदे, गीता कोठावळे, सीए. किशोरकुमार मांढरे, अनिल देव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल, सुहास पानसे आदी उपस्थित होते.