लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या मूर्तीला व मंदिरातील इतर देवांसह मंदिरास म्हसवडनगरीच्या भक्तांनी पहिल्यांदाच 551 किलोच्या विविध फळांची आरास सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पनेतून करण्यात येऊन आरासानंतर शहरात ती सर्व फळे प्रसाद म्हणून वाटण्यात आली.
म्हसवड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या मूर्तीला व मंदिरातील इतर देवांसह मंदिरास म्हसवडनगरीच्या भक्तांनी पहिल्यांदाच 551 किलोच्या विविध फळांची आरास सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पनेतून करण्यात येऊन आरासानंतर शहरात ती सर्व फळे प्रसाद म्हणून वाटण्यात आली.
रविवार हा श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी मंदिरात विशेष आरास करण्याचा मानस सावकारी यांनी व्यक्त करताच शहरातील अनेकांनी ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार यथाशक्ती फळे दिली.
यामध्ये आंबा, चिकू, फणस, पपई, द्राक्ष, अननस, केळी, सफरचंद, पेरू स्ट्रॉबेरी, मोसंबी व डाळिंब यासह विविध फळे भाविकांनी दान म्हणून केली. ही फळे 551 किलो झाल्याने या सर्व फळांची सालकरी अविनाश गुरव यांनी संपूर्ण मंदिरात विशेष आरास केल्याने मंदिरात नेत्रदीपक व मनमोहक असे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
मंदिरामध्ये दरवर्षी सालकरी बदलले जात असून, अविनाश गुरव यांच्याकडे गत 300 दिवसांपासून मंदिरातील मुख्य पुजारी होण्याचा बहुमान आहे. या काळात त्यांनी वेगवेगळ्या वेशभूषेत श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांचा आरास करून एक नवा विक्रम केला आहे. देणारा तोच आहे, मी मात्र फक्त निमित्त आहे, असे सालकरी अविनाश गुरव सांगत आहेत.
सध्या कोरोनाचे सावट सर्वत्र आहे. माण तालुका हॉटस्पॅट बनला आहे, मात्र म्हसवडवासीयांनी नाथ कृपेने कोरोनाला चांगलेच रोखले आहे, ही श्रींची कृपा असल्याची भावना भाविकांमध्ये आहे.