महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्या शंभू महादेवाचे देवस्थान असलेल्या शिंगणापूरमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस कायमच धावत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारीने सर्वत्रच थैमान घातल्याने एसटीची सेवा सुमारे 5 महिन्यांपासून बंद होती.
शिखर शिंगणापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्या शंभू महादेवाचे देवस्थान असलेल्या शिंगणापूरमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस कायमच धावत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारीने सर्वत्रच थैमान घातल्याने एसटीची सेवा सुमारे 5 महिन्यांपासून बंद होती.
तसेच लॉकडाऊनचे रूपांतर हळूहळू ‘अनलॉक’मध्ये होऊ लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण जनतेची रक्तवाहिनी असलेल्या एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पाच महिन्यांपासून बंद असलेली लालपरीची लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली आहे.शिंगणापूरमध्येही मुखेड-शिंगणापूर या बसचे उत्साहात आगमन झाले.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड आगाराची एसटी बस पाच जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून जवळपास 400 ते 450 किलोमीटर अंतर पार करून मुखेड-शिंगणापूर ही लालपरी गुरुवारी सांयकाळी 6.45 वाजता शिंगणापूर नगरीत दाखल झाली. यावेळी शिंगणापूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत लालपरीचे उत्साहात स्वागत केले.
तब्बल पाच महिन्यांनी शिंगणापुरात अवतरली लालपरी
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची रक्तवाहिनी म्हणून एसटी बस महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय शालेय शिक्षण घेणारे, अपंग असणार्यांना अल्प दरात सेवा देत असते. या पाच महिन्यांच्या कोरोना महामारीत सेवा खंडित झाली होती. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लालपरी गावात अवतरली.