मानधन वाढीमुळे पाटण तालुक्यातील पोलिस पाटील बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात भरीव वाढ झाली आहे. आता पोलीस पाटलांना महिन्याला मिळणार १५००० रुपये मानधन मिळणार असल्याने समस्त पोलिस पाटील बंधू भगिनीमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे राज्यातील पोलीस पाटील यांची मानधनवाढी संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे मागणी प्रलंबित होती. सन २०१९ पासून सातत्याने पोलीस पाटलांचा मानधन वाढीसह विविध विषय प्रलंबित होते. तत्कालीन शासनामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईसाहेब हे गृह राज्यमंत्री असताना पोलीस पाटलांच्या विविध मागण्या संदर्भात नेमण्यात आलेल्या अभ्यास गट समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षते खालील समितीने पोलीस पाटील यांच्या मानधनवाढी संदर्भात सकारात्मक अहवाल सादर केला होता. हा अहवाल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, यांनी बुधवार दि. १३ मार्च २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पाटण तालुक्यातील पोलीस पाटलांसोबत सदैव पाठीशी राहणारे आदरणीय ना. शंभूराज देसाई (राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा) यांच्या माध्यमातून गेली अनेक महिन्यांपासून मा. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महोदय यांचेकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास अनुसरून राज्यातील पोलीस पाटील यांच्या भरघोस मानधन वाढीच्या संदर्भात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयासंबंधी महायुती सरकारचे तसेच या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करणारे नामदार. शंभूराज देसाई साहेब यांचे पाटण तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू, भगिनींच्या वतीने विशेष मनःपूर्वक आभार! मा. राहुल विलासराव सत्रे, पोलीस पाटील आडूळ व मा. अध्यक्ष, पाटण तालुका पोलिस पाटील संघटना यांनी मानले.