पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉल धारकांचे लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी पाचगणी श्रमजीवी स्टॉल युनियनच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पाचगणी : पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉल धारकांचे लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी पाचगणी श्रमजीवी स्टॉल युनियनच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत निवेदनातील अधिक माहिती अशी की, गेली पाच महिने कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात पूर्ण बाजारपेठ बंद होती. हे सर्व स्टॉल धारक हे गरीब व हातावर पोट असणारे असून, आता कुठे उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यात काही बंद आहेत. आणि सध्या ग्राहक सुद्धा नसल्याने कधी-कधी पालिकेच्या भाड्याचेही पैसे मिळत नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणीत हे सर्व स्टॉल धारक आहेत. आणि लगेच पालिकेने भाडे वसुली सुरू केली आहे. त्यात पाच महिने दुकाने बंद असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांचे भाडे पालिकेने माफ करावे, असेही शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन मुख्याधिकार्यांनी स्टॉल धारकांना दिले.
या वेळी श्रमजीवी स्टॉल धारक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, सचिव यशवंत पारटे, दीपक कांबळे व इतर स्टॉल धारक उपस्थित होते.