सांगली जिल्ह्यातील वजनदार नेत्यांनी कायम दुष्काळात होरपळणार्या माणच्या पूर्वेकडील जनतेला डावलून टेंभू योजनेतील पाण्याचा एक थेंबही न देता, सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून पाणी पुन्हा सांगली जिल्ह्यातील दिघंचीकडे वळवले आहे.वरकुटे-मलवडी, शेनवडी गावच्या सीमेवरून टेंभू योजनेचे पाणी जात असताना स्वातंत्र्य पूर्व काळापासून तहानलेली जनता कसलीही तमा न बाळगता, जनआंदोलन उभारून पाणी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचे मत पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते धीरज जगताप यांनी शेनवडी येथे व्यक्त केले.
वरकुटे-मलवडी : सांगली जिल्ह्यातील वजनदार नेत्यांनी कायम दुष्काळात होरपळणार्या माणच्या पूर्वेकडील जनतेला डावलून टेंभू योजनेतील पाण्याचा एक थेंबही न देता, सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून पाणी पुन्हा सांगली जिल्ह्यातील दिघंचीकडे वळवले आहे.वरकुटे-मलवडी, शेनवडी गावच्या सीमेवरून टेंभू योजनेचे पाणी जात असताना स्वातंत्र्य पूर्व काळापासून तहानलेली जनता कसलीही तमा न बाळगता, जनआंदोलन उभारून पाणी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचे मत पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते धीरज जगताप यांनी शेनवडी येथे व्यक्त केले.
शेनवडी, ता. माण या ठिकाणी टेंभू योजनेतील शेतीपाण्याच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी सुरेश कदम, बाळासाहेब आटपाडकर, संजय जगताप, अभय जगताप, साहेबराव खरात, माणिक काळेल, अनिकेत आटपाडकर, आप्पासो सरतापे, कांतीलाल आटपाडकर आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
शेनवडी, वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, कुरणेवाडी गावच्या पंचक्रोशीचा परिसर कोणत्याही पाणीसिंचन योजनेत समाविष्ट केलेला नाही. हा भाग सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर तर सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असून, वरील गावांना वंचित ठेवून या गावांच्या सीमेवरून टेंभू योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यातील दिघंचीकडे वळवण्यात आले आहे. जलसंधारण प्रकल्पाचे नियोजन करताना ते वॉटर शेड एरियानुसार केले नसल्याने, जी गावे त्या नैसर्गिक वॉटर शेड एरियामध्ये येतात. त्यांना ही योजना लागू असायला हवी होती; परंतु तसे न करता जिल्ह्याच्या राजकीय सीमेचा विचार करून टेंभू प्रकल्पाचे लाभ क्षेत्र ठरविण्यात आले आहे.
त्यामुळे मााणपूर्व भागातील शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली असून, आम्हाला मिळाल्याशिवाय पाणी पुढे जावू द्यायचे नाही. त्यासाठी काहीही झाले तरी टेंभू योजनेचे पाणी मिळवायचेच, या इराद्याने शेतकर्यांनी आंदोलन हातात घेतले असून, आता नाही तर कधीच मिळणार नाही. म्हणून आर या पार म्हणत तीव्र आंदोलनासाठी पावले उचलली आहेत.
मागील सरकारने या बाबींचा विचार करून कायमस्वरूपी दुष्काळ परिस्थितीमुळे होरपळणार्या गावांना टंचाईच्या काळात महाबळेश्वरवाडी गावच्या तलावामध्ये टेंभू योजनेतून पिण्याचे पाणी सोडण्याची उपाययोजना केली आहे. टेंभू योजनेतील दिघंची वितरिकेतून बौद्धजनांचा तलाव, मिसाळ वस्ती/पडळकर खडक तलावामध्ये पाणी सोडून तेथून कुरणेवाडीतील तलावामार्गे दिघंचीकडे नेण्यात यावे. येथील शेतकर्यांचा सहनभूतीपूर्वक विचार करावा आणि विशेष बाब म्हणून टेंभू योजनेचे पाणी या भागातील तलावात सोडावे, याकरिता माण तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्याकरवी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चाही करण्यात आली आहे.
पाणी वाघमोडे वस्तीच्या ओढ्यात सोडण्याची मागणी
वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी या गावांच्या दक्षिणेकडील बाजूने टेंभू योजनेचे पाणी गेले आहे तर उत्तरेकडील बाजूने तारळी योजनेचे पाणी भोजलिंग पायथ्यालगत येऊन जांभुळणी मार्गे राजेवाडी तलावामध्ये सोडण्यात आले आहे. या दोन्हीही योजनेतून वरील चार गावांतील पंचक्रोशीचा परिसर वगळण्यात आला आहे. भोजलिंग पायथा परिसरात कॅनॉलला एक आउटलेट ठेवून पाणी वाघमोडे वस्तीच्या ओढ्यात सोडण्यात यावे, अशी मागणीही शेतकर्यांनी केली आहे..