वाढदिवसाचा खर्च टाळून वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश जाधव यांनी कोरोना बाधित रुग्णांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
वडूज : वाढदिवसाचा खर्च टाळून वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश जाधव यांनी कोरोना बाधित रुग्णांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश जाधव यांचा आज वाढदिवस होता. मात्र, सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आपण खारीचा वाटा उचलून बाधित रुग्णांना मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
दरम्यान, आज त्यांनी वडूज ग्रामीण रुग्णालय वडूज येथे भेट दिली असता याठिकाणी जे बाधित रुग्ण आहेत, त्या व्यक्तींना जेवण हे योग्यरित्या येत आहे. मात्र, त्यांना जेवण करण्यासाठी आवश्यक असणार्या प्लेट्स या योग्य नाहीत. हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने 32 प्लेट आणि 70 वाट्या आणल्या. तसेच रुग्णांना फळे, मास्क, सॅनिटायझरच्या बाटल्या स्व-खर्चातून आणल्या.
यावेळी बोलताना आकाश जाधव म्हणाले, ‘रुग्णांना वाटावं की आपण आजारी असलो तरी घरी जेवण करत आहोत तसेच या विचारांनी रुग्णांनी positive म्हणजे सकारात्मक भावना निर्माण करावी म्हणून आज त्यांना या प्लेट्स, तसेच इतर साहित्य ग्रामीण रुग्णालय वडूज येथे देत आहोत. तसेच दिलेल्या प्लेट्स या पुन्हा वापरात याव्यात यासाठी त्यांचं योग्य प्रकारे सॅनिटायझेशन व्हावे म्हणून स्वतः 50 बॉटल सॅनिटायझर उपलब्ध करून दिले.’
यावेळी सोमनाथ जाधव, डॉ. संतोष मोरे, किरण गोडसे, डॉ. सम्राट भादुले, दीपक जाधव, आदित्य पंडित, शेखर कोकाटे, अक्षय यादव आदी उपस्थित होते.
रुग्ण संख्या वाढत असताना समाजातील काही संवेदनशील व्यक्ती सर्व प्रकारे मदत करत आहेत. आज आकाश जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा केला. समाजातील व्यक्तींनी अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत काम करावे.
- डॉ. संतोष मोरे, वैद्यकीय अधिकारी, वडूज.